Share

खाजगी रुग्णालयांनी कोरोनाच्या निमित्ताने जास्त शुल्क आकारू नये : CM ठाकरे

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील खाजगी रुग्णालयांना काही सूचना केल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना भरमसाठ शुल्क आकारु नये, खाजगी हॉस्पिटल्सनी जास्तीत जास्त खाटा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

खाजगी हॉस्पिटल्स रुग्णांना भरमसाठ शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी येत होत्या, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खाजगी हॉस्पिटल्सच्या संचालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला हिंदुजा, लिलावती, नानावटी, सैफी, बॉम्बे अशा मोठ्या खाजगी हॉस्पिटल्सचे संचालक बैठकीला उपस्थित, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेसुद्धा बैठकीला उपस्थित, प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांना भरमसाठ शुल्क आकारु नका. तर खाजगी हॉस्पिटल्सनी जास्तीत जास्त खाटा उपलब्ध करुन द्याव्यात जेणेकरून कमीत कमी वेळात रुग्णांवर उपचार करता येईल. ही बैठक बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत पार पडली.

याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मजुरांसाठी मोठी घोषणा केली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजुरांचे चांगलेच हाल झाले आहेत. त्यात हाताला रोजगार नसल्याने या मजुरांची आर्थिक बाजू पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळ या मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठीही पैसे नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मजुरांच्या प्रवासाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीमधून देण्याची घोषणा केली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनाने केले BSF जवानांना लक्ष्य, 9 जवानांचे कोरोना अहवाल सकरात्मक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ट्विटवरून केले आंदोलन, किमान प्रति किलो 20 रुपये तरी दर मिळावा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!