Share

कोरोनाने केले BSF जवानांना लक्ष्य, 9 जवानांचे कोरोना अहवाल सकरात्मक

Published On: 

नवी दिल्ली : पोलिसां पाठोपाठ आता कोरोनाने BSFच्या जवानांना देखील लक्ष्य केले आहे. आज BSFच्या ९ जवानांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांचे अहवाल हे सकरात्मक आले आहेत. सध्या या जवानांवर कोरोना हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बाधित ९ जवानांपैकी सहा जवान दिल्लीचे, १ कोलकाता आणि २ त्रिपुराचे आहेत. यापूर्वी कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात तैनात असलेल्या सीआयएसएफच्या एएसआय आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहारेकरी म्हणून नेमलेले हेड कॉन्स्टेबल रँक अधिकारी कोरोनामुळे मरण पावले होते.

दरम्यान राज्यात कोरोनाच्या संकटात खंबीरपणे उभी असलेली पोलीस यंत्रणा आता कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहे. राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या 88 अधिकार्‍यांसह तब्बल 698 अंमलदार अशा एकूण 786 पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, राज्यात कोरोना बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असलेल्या 88 पोलीस अधिकार्‍यांसह 698 अंमलदार अशा एकूण 786 पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 7 जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून 13 अधिकार्‍यांसह 63 अंमलदार असे एकूण 76 पोलीस उपचारांअंती कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 75 अधिकार्‍यांसह 628 अंमलदार अशा एकूण 703 कर्मचार्‍यांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!