🕒 1 min read
मुंबई : कोरोना संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या मुंबईतली स्थिती सध्या गंभीर झाली आहे. सुरुवातीला सरकारी रुग्णालये हाउसफुल्ल तर आता खाजगी रुग्णालयांनीही ‘No beds available’ सांगत कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या जीवाशी खेळ सुरु केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका, ICMR आणि महाराष्ट्र सरकारने यावर त्वरित तोडगा काढून मुंबईतील नागरिकांना बेड्स उपलब्ध करून दयावेत. याबाबत भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुंबई महापालिका आयुक्त ईक्बाल चहल यांना पत्राद्वारे परिस्थिती सांगत तातडीने रुग्णांच्या ‘बेडस्’ चा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे.
सद्यस्थिती आणि रुग्णांचे हाल
काल मुलुंड पूर्व मधील दोन कोरोनाबाधित रूग्णांना ( ६० वर्षीय) खासगी हॉस्पिटल्सनी एडमिट करून घेण्यास नकार दिला. या हॉस्पिटल्सच्या मॅनेजमेंटचं म्हणणं आहे की, आमच्याकडे रूग्णांना प्रवेश देण्यासाठी बेडच उपलब्ध नाही. तर दुसरीकडे सायन मध्ये राहणा-या एका (३० वर्षे) तरुणाला आणि त्याच्या ३ वर्षाचा मुलगाही पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांनाही अद्याप कोणत्याच रुग्णालयात प्रवेश मिळू शकलेला नाही.
भाजप नेते किरीट सोमैया आणि डॉक्टारांनीही या रूग्णांना पुढील उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळावा म्हणून मुलुंड, पवई, चेंबूर, सायन आणि परळ येथील खासगी हॉस्पिटलमध्ये विचारणा केली. पण या सर्व हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आणि मॅनेंजमेंटने हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याचे सांगून एडमिशन देण्यास नकार दिला आहे.
आता, शाळांमध्ये उत्तरपत्रिका पोहचवण्यासाठी पोस्टाची मदत घेणार
सध्याची परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक असलेल्या रुग्णांचे आणि लहान मुलांचेही हाल होत असताना दिसत आहे. ठाकरे सरकारने आणि महापालिकेने याबाबत तातडीने पाऊलं उचलत उपाययोजना न केल्यास भविष्यात मुंबईकरांना कोरोनासंदर्भात उपचारासाठी याहून अधिक गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असे भाजप नेते किरीट सोमैया यांनी स्पष्ट केले आहे.
वाढीव वेळ देण्यास राज्यपालांनी नकार दिला हे चुकीचं; काँग्रेस नेत्याची नाराजी
कोरोनाचा साखर उद्योगांना फटका, यावर केंद्राने विशेष लक्ष द्यावे : पवारांचे PM मोदींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
