🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यपालांनी शिवसेनेला वेळ देण्यास नकार दिला असेल, तर हे चुकीचं आहे, असे काँग्रेस नेते, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले आहेत. राज्यपालांनी दिलेल्या वेळेत शिवसेना सत्ता स्थापन करण्यास अपयशी ठरली आहे.
मात्र, सत्ता स्थापनेचा दावा शिवसेनेने कायम ठेवला आहे. राज्यपालांनी सेनेला वाढीव मुदत नाकारली असली तरी, अद्याप कोणतेही सरकार अस्तित्वात नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेला वेळ वाढवून देण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला चर्चेला बोलावले आहे.
As per #Aditya T, governor refuses even two days time. If true, this is wrong cos #PresRule by definition shd be last resort &all possible options to form govt must 1st be exhausted. 48 hrs not excessive. Refusal of #govnor unreasonable if true & suggests desperation 4Pres rule!
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) November 11, 2019
सिंघवी या ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानुसार राज्यपालांनी दोन दिवसांचा अवधी नाकारला आहे. हे सत्य असेल तर चुकीचे आहे. कारण राष्ट्रपती राजवट हा सर्वात शेवटचा पर्याय असू शकतो, असे सिंघवी म्हणाले आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले, सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी सर्व पर्याय तपासून पाहणे गरजेचं आहे. वाढवून मागितलेले 48 तास जास्त वेळ नव्हता. राज्यपालांना वेळ वाढवून देण्यास नकार दिला हे अयोग्य आणि निराशाजनक आहे, असे म्हणत सिंघवी यांनी ट्वीटद्वारे नाराजी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1193916586597310466?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1193912678126780416?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
