टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाने ‘एक मराठा लाख मराठा’ हे वाक्य केवळ म्हटलं नाही तर ते जगलं असे गौरउद्गार भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी काढले आहेत मराठा समाजाने आंदोलने शांततेत कशी करावीत याचा आदर्श जगाला दाखवून दिला आहे. ‘एक मराठा लाख मराठा’ हे वाक्य त्यांनी केवळ म्हटलं नाही तर ते जगलं. त्यांना मी शुभेच्छा देते, असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.
तर देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे हाताळला आहे. त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम झालं. पण मी एकट्या मुख्यमंत्र्यांना याचं श्रेय देणार नाही, असं प्रीतम मुंडेंनी म्हटलंय. आरक्षण मिळालं तर कोर्टाची जमेची बाजू आणि आरक्षण नाही मिळालं तर सरकारची जबाबदारी, असं नसतं. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यात भाजप सरकारचा मोठा वाटा असल्याचं प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
