Share

पंतप्रधान मोदी येत्या २१ जून रोजी देशातील जनतेला संबोधित करणार

Published On: 

नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ जून रोजी देशातील जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या या संबोधनाचे निमित्त म्हणजे ‘जागतिक योग दिवस’. २१ जून रोजी संपूर्ण जगभरात ‘जागतिक योग दिवस’ साजरा केला जातो. ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली अत्यंत एक मोठी आणि अमूल्य अशी देणगी आहे. याच दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान देशातील संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे यंदाचा योग दिन हा डिजीटल होण्याची शक्यता आहे. योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे सामूहिक कार्यक्रम यंदा पहायला मिळणार नसल्याचं दिसत आहे.

अनेक ठिकाणी नागरिक हे आपल्या घरातच योगा करुन योग दिनाच्या कार्यक्रमात सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी होतील.पंतप्रधान मोदी ‘जागतिक योग दिवशी’ म्हणजेच २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता देशातील जनतेला संबोधित करतील.

सर्व माध्यमांतून पंतप्रधानांच्या या संबोधनाचे थेट प्रक्षेपण लोकांना पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान स्वतः योगाभ्यास करतात. त्याचप्रमाणे, ते वेळोवेळी देशातील जनतेला देखील ‘योग’चे महत्त्व पटवून देत आले आहेत.

…म्हणून मनसे ठेवणार आता सर्व माध्यमांच्या शाळांवर नजर!

80 वर्षांचा योद्धा पुन्हा ‘फिल्ड’वर, आजपासून पवार कोकण दौऱ्यावर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!