🕒 1 min read
नवी-दिल्ली : महागाई, इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याच पार्श्वभूमीवर एका व्हिडीओच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी(भाजपा)ने न केलेल्या कार्यांची पोलखोल करण्यात आली आहे.
युवक काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये मोदी सरकारने केलेल्या कार्याचा उलगडा करण्यात आला असून दिवसेंदिवस तेल आणि डिझेलचे भाव कशाप्रकारे गगनाला भिडले आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तसेच व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ‘ऑयल बॉन्ड्स’ म्हणून संबोधण्यात आले आहे. ‘तेल रोख्यांबाबत मोदी सरकारचे मोठे खोटे उघड! भाजप लबाडीची लागवड करते, खोटे वाढवते, खोटे कापते आणि खोटे विकते. तसेच ७ वर्षे सत्तेत असून सुद्धा आपले अपयश लपविण्यासाठी मोदी सरकार मागील सरकारला दोष देते’ असे ट्विट करत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
ऑयल बांड्स को लेकर मोदी सरकार का महाझूठ उजागर!
भाजपा झूठ की खेती करती है, झूठ उगाती है, झूठ काटती है और झूठ बेचती है!
अपनी कारगुजारियों और नाकामियों पर पर्दा डालने के लिए पिछली सरकारों पर दोषारोपण करती है जबकि 7 साल से ये सत्ता में हैं और महंगाई सातवें आसमान पर! pic.twitter.com/eXSBYt8538
— Indian Youth Congress (@IYC) August 18, 2021
दरम्यान, जुलै महिन्यापासून ते आत्तापर्यंत पेट्रोलच्या किमतीत ९ वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये ५ वेळा वाढ झाली आहे. तसेच यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये १६-१६ वेळा वाढ झाली होती. पुढे ४ मे नंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ११.४४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ०९.१४ रुपये प्रति लिटर महाग झाले असून आजच्या घडीला मुंबईत पेट्रोलची किंमत १०७.८३ रुपये आणि डिझेलची किंमत ९७.४५ रुपये प्रति लिटर आहे.
तर देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर १०१.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ८९.८७ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर १०२.०८ रुपये, तर डिझेलचे दर ९३.०२ रुपये प्रति लिटर आहेत. तसेच, चेन्नईतही पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. चेन्नईत पेट्रोल १०२.४९ रुपये लिटर आहे, तर डिझेल ९४.३९ प्रति लिटरने विकले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबान्यांना धक्का ; उपराष्ट्रपति अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला कार्यकारी राष्ट्रपती म्हणून केलं घोषित
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
- राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? ‘सामनातून’ टीका
- ‘दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य’; टास्क फोर्स प्रमुखांची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
