ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला 20 षटकांचा सिडनी येथे झालेला सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेतला हा दुसरा सामना जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेले 195 धावांचे आव्हान भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. शिखर धवन 52, विराट कोहली 40 आणि हार्दिक पंड्याच्या नाबाद 42 धावांनी भारताचा विजय साकार केला.
दरम्यान, भारतीय संघाकडून हार्दिक पंड्याने २२ चेंडूत ४२ धावांची तुफानी खेळी करत भारताचा विजय निश्चित केला. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला पंड्याने आपल्या या खेळीनं अनेक आजी माजी क्रिकेटपटूंना प्रभावित केलं आहे. टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने हार्दिकचं कौतुक केलं आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, “हरभजन पंड्याच्या खेळीमुळे प्रभावित झाला आहे. हार्दिकच्या विश्वासात दिवसेंदिवस भर पडतेय. हार्दिक टीम इंडियाचा बेस्ट फिनिशर आहे. हार्दिक वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेल इतकाच किंवा त्यापेक्षा सर्वोत्तम आहे. हार्दिक आपल्या इच्छेनुसार फटकेबाजी करतो. तसेच षटकारही खेचतो”, असं म्हणत हरभजनने हार्दिकचं कौतुक केलं.
महत्वाच्या बातम्या
- लोकशाही मार्गाने चालणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवले जात आहे : सचिन सावंत
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- हार्दिक पंड्याची नव्हे तर ‘या’ खेळाडूची कामगिरी सामना जिंकवून देणारी : मूडी
- ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
- माझी नाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनताच पुढे ढकलत आहे : मुश्रीफ

