Share

आधी कांदा, आता दुध, दरवाढीचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सामान्य माणसाच्या खिशाला आता पुन्हा झळ बसणार आहे. तसेच गृहिणीचे बजेट आधीच कोलमडले आता पुन्हा त्यामध्ये भर पडणार आहे. कारण आधी पेट्रोल नंतर कांद्याचे गगनाला भिडलेले भाव यामध्ये भर आता दुधाची पडली आहे. उद्यापासून दुधाचे भाव वाढणार आहेत.

राज्यात गायीचे दूध सोमवारपासून (१६ डिसेंबर) लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. म्हशीच्या दुधात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना सोमवारपासून फक्त गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी ४४ ऐवजी ४६ रुपये मोजावे लागणार आहेत. देशातील प्रसिद्ध कंपनी अमूलने आपल्या दुधाच्या दरामध्ये विविध राज्यांमध्ये शनिवारी प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. आपल्या अमूल गोल्ड आणि अमूल ताजा या दुधाच्या दरांमध्ये दोन रुपये वाढ केली आहे. तर मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या किमतीत प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ केली आहे.

पुण्यात शनिवारी दूध खरेदी विक्रीच्या दराचा आढावा घेण्यासाठी सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची कात्रज डेअरी येथे झाली, त्या सभेत दरवाढीबाबत निर्णय घेण्यात आला. विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करतानाच शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना लिटरमागे एक रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.

मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगलामध्ये ही दरवाढ लागू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206090649625186305?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206088560165523458?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!