अहमदनगर / ऋषिकेश घोगरे : पारनेर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करण्याचे आवाहन करीत गणराया या संकटातून आम्हाला लवकर बाहेर काढा अशी भावनिक साद पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी गणपती बाप्पाला घातली.
येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार लंके ‘महाराष्ट्र देशा’शी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गणपतीचे आगमन आपल्यासाठी एक मोठा सणचं असतो. मात्र सध्याची परिस्थिती पाहता घरगुती गणेशोत्सव साजरा करून आपली श्रद्धा जोपासणे गरजेचे आहे. गणेश मंडळांनी देखील यावर्षी नियमांचे पालन करून इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने हा उत्सव साजरा करावा असेही निलेश लंके यांनी सांगितले.
‘त्या’ निविदेसाठी माझ्या मुलानं पदाचा गैरवापर केला नाही – किशोरी पेडणेकर
तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिराविषयी बोलताना आमदार लंके म्हणाले की, कोरोनाच्या काळात जनतेला आधार देण्याचे काम केल्याने आनंद झाला तर दुसऱ्या बाजूने हे संकट कधी दूर होईल याचे देखील दुःख झाले. या आरोग्य मंदिराचा शुभारंभ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील या सेंटरला शुभेच्छा देत राष्ट्रवादीचे आमदार व कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे काम केल्यास कोरोनाचे हे संकट दूर होईल अशा शब्दांत सुप्रियाताई सुळे यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केल्याचेही आमदार लंके यांनी सांगितले.
कर्जुले हर्या येथील आरोग्यमंदिरात सर्व सुख-सुविधा उपलब्ध असून येथे दाखल झालेल्या रुग्णांना आयुर्वेदिक काढा, अंडी, दूध व दोन वेळचे दर्जेदार जेवण मिळत असल्याने रुग्णांमध्येही आनंदी वातावरण आहे. येथे दाखल झालेले सर्व रुग्ण हे आनंदाने घरी जातील असा विश्वासही आमदार लंके यांनी व्यक्त केला.उपचाराबाबत काही अडचण निर्माण झाल्यास माझ्याशी अथवा संपर्क कार्यालयाशी त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन देखील आमदार लंके यांनी केले आहे.गणेशाच्या कृपेने हे संकट लवकरच दूर होईल व पुन्हा पूर्वीसारखे जिवन लोक जगतील हा विश्वास देखील लंके यांनी व्यक्त केला.
‘ते’ 18 कोटी पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

