Share

जय्यत तयारी सुरु ! भारत विरुद्ध इंग्लंडमधील चेन्नई कसोटींसाठी २ नव्या पंचांची नियुक्ती

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यास अवघ्या एका आठवड्याचा कालावधी उरला आहे.  कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे.

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांदरम्यान चेन्नई येथे ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची रंगतदार कसोटी मालिका सुरू होत आहे. या कसोटी मालिकेतून कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 6 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.

अशात गुरुवारी (२८ जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी पंचांची घोषणा केली आहे. यात आयसीसीच्या एलिट पॅनलमधील पंच नितिन मेनन यांचा समावेश आहे. त्यांच्याव्यतिरिक्त दोन नव्या पंचांचे या सामन्यांद्वारे पदार्पण होणार आहे.

प्रसिद्ध क्रिकेट वेबसाइट क्रिकबझमधील वृत्तानुसार, मेनन यांच्याव्यतिरिक्त अनिल चौधरी आणि विरेंद्र शर्मा यांची चेन्नईतील कसोटी सामन्यांत निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे.

५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात मेनन यांच्याबरोबर चौधरी पंचगिरी करताना दिसणार आहेत. तर १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शर्मा यांच्यावर ही जबाबदारी असणार आहे. दुसरीकडे माजी भारतीय क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ हे या दोन्ही सामन्यांचे रेफरी असतील. हे दोन्ही सामने चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!