🕒 1 min read
मुंबई : मुंबै बँकेत दरेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी दरेकरांविरोधात आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. त्यांनी दरेकरांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे.
या आंदोलनात “भाजपला जरा जरी लाज उरली असेल तर मुंबईला लुटणाऱ्या प्रवीण दरेकरांचा राजीनामा घ्यावा”, अशी तिखट प्रतिक्रिया यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. तसेच प्रवीण दरेकरांचा जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही असेही सांगितले.
पंतप्रधान मोदी बोलतात. ना खाऊंगा, ना खाने दुंगा, मग प्रवीण दरेकरांचा राजीनामा का घेत नाही? असा सावल देखील आपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हे आंदोलन आता फक्त सुरू झालं आहे. असाही इशारा आपने दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचा दरेकरांना पाठिंबा असल्याचाही आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
“…प्रवीण दरेकर चोर है” – आम आदमी पार्टी दरेकरांविरोधात आक्रमक
वरुण धवन आणि जान्हवी कपूर करणार ‘बवाल’ पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र
IPL 2022: ‘तुला अजून एक सीजन कॅप्टन बनायचे नाही का?’; कॉनवेच्या प्रश्नाला धोनीने दिले ‘असे’ उत्तर
“भाजपला निवडणुकीत केजरीवालांचा पराभव करता आला नाही म्हणून…”, ‘त्या’ घटनेवरून ‘आप’ चा संताप
अरविंद केजरीवालांच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला; गेटवर भगवा रंग टाकत तोडफोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
