मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यामुळे पक्षातील अनेक आमदार फुटले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र यानंतर आणखी कोणत्या पक्षातील आमदार फुटणार केव्हा एकनाथ शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. या सर्व राजकीय घडामोडीनंतर आता काँग्रेस पक्षातील मोठे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिल्याचे समोर आले आहे.
अर्धापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आज खासदार प्रतापराव चिखलीकर गेले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, ‘अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानले आहेत. अशोक चव्हाण हे काय माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत पण जे काम चांगले होईल त्याचे मी अभिनंदन व स्वागत करेल. आज नांदेड शहरांमध्ये सगळीकडे खड्डे करून ठेवलेत, याबाबत मी त्यांच अभिनंदन नाही करणार पण ते खड्डे बुजवण्याचे मी प्रयत्न करणार आहे. अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचे संकेत दिसत आहेत. त्यांचे पक्षात येणे किंवा घेणे हे पक्षश्रेष्ठींच्या हातामध्ये आहे. अशोक चव्हाण हे जर भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांचे स्वागत करीन.” असे यावेळी प्रतापराव चिखलीकर म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे विधानसभेत बहुमत चाचणीच्या दिवशी गैरहजर राहिले होते. त्यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे इतर काही आमदार आहे त्या दिवशी बहुमत चाचणीला हजर नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. या बहुमत चाचणीत शिंदे गटाने भाजप सोबत मिळून बहुमत सिद्ध केले होते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

