🕒 1 min read
कोल्हापूर : “एकीकडे महालक्ष्मीची पूजा करायची अन् दुसरीकडे घराच्या लक्ष्मीची विटंबना” अशा कठोर शब्दात प्रणिती शिंदे यांनी भाजपचे नेते धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार प्रहार केला. उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान कोल्हापूरच्या दसरा चौकात प्रणिती शिंदे बोलत होत्या.
भाजप नेते धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत नुकतेच वादग्रस्त विधान केले होते. महाडिक म्हणाले होते की, “काँग्रेसचे उमेदवार महिला आहेत त्यामुळे महिलेला मते द्या, असे ते सांगतील. परंतु जे काम तुमचा प्लंबर असलेला, इलेक्ट्रिशियन असलेला नवरा करतो ते तुम्हाला जमणार आहे का, ज्याचे काम त्यानेच करायचे असते.”
प्रणिती शिंदे यांनी महाडिकांच्या याच वक्तव्याचा समाचार घेतला. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, “महिलांचा अपमान करणे ही भाजपची संस्कृती आहे. भाजप नेहमीच खालच्या पातळीचं राजकारण करते. राजकारण कसं करू नये हे भाजपकडून शिकावं,” असा टोला ही प्रणिती यांनी लगावला.
“मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अबू आझमींचे प्रत्युत्तर
IPL 2022 : प्लेऑफ आणि फायनलबाबत मोठं अपडेट; ‘या’ ठिकाणी रंगणार शेवटचे चार सामने?
IPL 2022: हैदराबादवर शानदार विजयानंतरही राहुल मात्र नाराज; ‘या’ खेळाडूंना फटकारले
“गणपती, नवरात्री, विवाह समारंभात…”, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया
“भाजप केवळ समानतेच्या गप्पा मारत नाही तर…” ; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
