🕒 1 min read
सोलापूर : भारतासह जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. २०२० सह २०२१ च्या सुरुवातीला देखील कोरोना रोगाने देशात थैमान घातल्याने हजारो लोकांना आपला प्राण गमवावा लागला असून हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रांची आर्थिक घडी विस्कटली आहे. छोटे उद्योग-व्यवसाय असलेले, शेतकरी यांच्यासह नोकरदार वर्गाला देखील याचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पहिल्या लाटेत सुरुवातीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे केलेल्या आवाहनावर टीका सोडत ते माध्यमांसमोर यायला घाबरत असल्याचं देखील म्हटलं आहे. ‘कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधान मोदींच जबाबदार आहेत. तसेच मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात. एकदाही ते माध्यमांसमोर आले नाहीत. फक्त मतदानाच्या वेळी समोर येतात आणि मतदान मागतात, त्यांना लाजही वाटत नाही,’ असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे.
पुढे बोलताना शिंदेंनी ईव्हीएम वरून देखील भाजप आणि मोदींना लक्ष्य केलं. ‘पंतप्रधान मोदी यांचं भूत सध्या वोटिंग मशीनमध्ये जाऊ बसलं आहे. हाताला मतदान केलं तर ते भाजपला जातं. त्यामुळे आधी शिक्का मारुन केलं जाणारं मतदानंच योग्य होतं. बॅलेट पेपर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,’ असं त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यसभेत महिला खासदारांना मारहाण, ही लोकशाहीची हत्या’,राहुल गांधींचा आरोप
- आयपीएल तयारीसाठी माही चेन्नईच्या कॅम्पमध्ये दाखल, व्हिडीओ व्हायरल
- ऐतिहासिक महेमूद दरवाजा लगतच्या अतिक्रमण धारकांना २४ तासांची मुदत
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
- Eng vs Ind : काही वेळातच दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात ; दोन्ही संघ ‘या’ मोठ्या बदलांसह उतरणार मैदानात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
