पुणे: शहरातील मराठा ज्वेलर्सचे माजी भागीदार प्रणव मराठे यांना ५ कोटी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. कोथरूड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांनी ठेवीदारांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रणव मराठे यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान न्यायालयाने प्रणव मराठे यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावेळी प्रणव मराठे यांना तपासासाठी पोलिस स्थानकात हजर राहण्याच्या अनेक नोटीसा पाठवण्यात आल्या. मात्र, प्रणवने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे अखेर कोथरुड पोलिसांनी प्रणवला अटक केली. सोबतच कौस्तुभ मराठे, मंजिरी कौस्तुभ मराठे , नीना मिलिंद मराठे आणि इतरांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणाची तक्रार शुभांगी विष्णू कुटे यांनी दिली होती. लक्ष्मी रोड तसेच पौड रोड कोथरूड येथील प्रणव मराठे ज्वेलर्सच्या शाखांमध्ये जानेवारी २०१७ ते जानेवारी २०२१ या कालावधीत फसवणूकीचा प्रकार घडल्याचे तक्रारमध्ये म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या नावाने चाकणमध्ये पैशांची मागणी; मंत्रालयानंतर आणखी एक प्रकरण आले समोर
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- बाप्पा कोरोना घालव रे…! पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला महत्वाचा निर्णय
- ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय!’; बदलीसाठी थेट मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ फोनमुळे खळबळ
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

