Share

ओबीसी आरक्षणाला हात लावला तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही- शेंडगे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे तर दुसरीकडे आता ओबीसी नेते देखील आक्रमक होऊ लागले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाज पेटून उठेल. या समाजाचा आक्रोश मग सरकारला पाहायला मिळेल, असा गर्भित इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ठाकरे सरकारला दिला.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारित करु नये. जर सरकारने तसा प्रस्ताव पारित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यासंबंधी काही पावले उचलली तर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आक्रोश होईल, असा इशारा शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर OBC आणि VJNT संघर्ष समितीकडून आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत प्रकाश अण्णा शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

‘मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारकडे काही ही मागणी केली तर सरकार लगेच त्यांना प्रतिसाद देते. राज्य सरकार जर मराठा समाजाला आमच्यापेक्षा वेगळं 13 टक्के आरक्षण देणार असेल तर त्याला आमची हरकत नाही. पण जर ओबीसी आरक्षणाला हात लावला तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराच शेंडगे यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!