टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरच्या जनतेला प्रेमानेही जिंकता आले असते, परंतु मोदी सरकारने कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय आगीशी खेळण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक धोरणं आखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, यावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आर्टिकल 370 चा मुद्दा उकरून काढल्याची टीका आंबेडकर यांनी केली आहे.
दरम्यान, 370 कलम हटवण्याच्या निर्णयामुळे पाकव्याप्त काश्मीरचे काय होणार? तो भाग भारताच्याच ताब्यात येणार आहे का ? याचं उत्तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी द्यावं, असा सवाल यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा
सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा, म्हणत सरकारचे समर्थन केले केले आहे. मित शहा यांनी मांडलेल्या विधेयकावर बोलत असताना संजय राऊत म्हणाले कि, मोदी सरकारने हिम्मत दाखवली आहे. आजचा दिवस स्वातंत्र्य दिनासारखाच आहे, कलम 370 हटवण्याला विरोध करणारे तेच आहेत, ज्यांनी 70 वर्ष काश्मीर धगधगतं ठेवलं, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे.
भारतासोबत आस्था असणाऱ्या लोकांना बाजूला करून ३७० हटवण्याचा निर्णय – पवार
सरकारकडून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे, मात्र दुसरीकडे विरोधकांनी सरकार मनमानी करत असल्याचा आरोप केला आहे. आझाद काश्मीरची भूमिका मांडणारे काही लोक तिथे होते, मात्र मेहबूबा मुफ्ती, गुलाबनबी आझाद, फारूक अब्दुल्ला यांच्या सारखे भारताशी निष्ठा असणारे काही लोक काश्मीरात आहेत. हे सर्वजण अतिरेकी भूमिका घेणाऱ्यां विरोधात भारताची भूमिका अखंडपणे मांडत आले आहेत, मात्र भारतासोबत निष्ठा असणाऱ्या लोकांना बाजूला ठेवून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
तर जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनणार
जुम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवतानाच लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरसह लडाख हे केंद्रशासित प्रदेश असणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३७० कलम हटवण्याचे विधेयक मांडताच विरोधी पक्षांनी थयथयाट केला आहे.
घटनेतील ३७० कलम हटवण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे हे आहेत फायदे
१) काश्मिरसाठीची वेगळी घटना व झेंडा संपुष्टात
२) काश्मिरात मालमत्ता विकत घेण्याचा आता भारतीयांना अधिकार
३) काश्मिरी नागरिकांचे दुहेरी नागरिकत्व यापुढे संपुष्टात
४) भारतीय संसद यापुढे काश्मिरसाठीही सर्वोच्च ठरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

