अकोला : लॉकडाऊन सरकारने खुशाल लावावा, आम्ही नागरिकांना लॉकडाऊन मोडायचं आवाहन करू, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. सरकार सर्वसामान्यांच्या पोटा-पाण्याचे प्रश्न सोडवू शकणार नसेल तर लॉकडाऊन मोडावं लागेल. अशा रीतीने प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनचा विरोध केला आहे.
कोरोनासंदर्भातील आकडे साशंकता निर्माण करणारे, मृत्यूदर, रिकव्हरी रेट यांचे आकडे फसवे आहेत. हे गणित सरकारनं समजून सांगावं. यातून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आमदार, खासदार, माजी आमदार-खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची कोरोना चाचणी करण्याचा वटहुकूम मुख्यमंत्र्यांनी काढावा. आपण स्वत: कोरोना टेस्ट केली, ती निहेटीव्ह आलीय, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
कामगार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्या – बच्चू कडू
भविष्यात शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात सध्या काही शक्यता नाही. ठाकरे कुटुंबियांशी जवळीक बाळासाहेबांपासून आहे. त्यात कोणतंही राजकारण नाही. मात्र शिवसेना सध्या राष्ट्रवादीसोबत असल्यानं त्यांच्यासोबत जाण्याचा कोणताही विचार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
‘विजयदुर्ग’साठी आता संभाजीराजेही आले धावून!


