विजयदुर्ग: ऐतिहासिक वैभव असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याची अवस्था खराब असून त्याच्या बुरुजांचीदेखील काही अंशी पडझड झालेली आहे. विजयदुर्ग किल्ला हा केंद्र शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाच्या अखत्यारितील भारतीय पुरातत्व विभागाकडे असून या किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी केंद्र शासनाने कागदोपत्री परवानगी द्यावी यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय पुरातत्व खात्याच्या नवनियुक्त प्रमुख ‘व्ही विद्यावती’ यांना काल भेटून माहिती दिली.
तसेच त्यांनी राज्यातील इतर गडकिल्ल्यांची देखील यावेळी त्यांनी दिली. तर याबाबत, संभाजीराजेंनी एक फेसबुक पोस्ट करत माहिती दिली असून शिवभक्तांसाठी खूप महत्वाची बाब आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेची सक्ती का?’युजीसी’ला सुप्रीम कोर्टाने दिले ४८ तासांत उत्तर देण्याचे आदेश
ते पोस्ट मध्ये लिहितात-
शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेला मराठा आरमाराच्या प्रमुख शक्ती केंद्रापैकी एक असलेल्या ‘विजयदुर्गाच्या’ बुरुजाची किंवा एकंदरीतच तटबंदीची झालेली पडझड आणि त्याची पुनर्बांधणी करणे व तसेच राजधानी रायगड च्या पावसाळ्यानंतर लगेच करावयाच्या कामांच्या कागदोपत्री परवानग्या मिळवण्यासाठी मी परवा दिल्लीला धाव घेतली. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या अवस्थेबद्दल केंद्रीय पुरातत्व खात्याच्या नवनियुक्त प्रमुख ‘व्ही विद्यावती’ यांना काल भेटून माहिती दिली.
‘महाजॉब्स’ पोर्टल नंतर आता ऍपही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लाँच!
‘विजयदुर्ग’ किल्ल्याची तटबंदी समुद्राच्या लाटांनी झिजवली आणि बुरुजचा भाग ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. स्वराज्यातील आरमाराचे प्रमुख शक्तिकेंद्र असलेला महत्वाचा जलदुर्ग काळाच्या ओघात विदीर्ण अवस्थेत पोचला असल्याचे काही शिवभक्तांनी माझ्या लक्षात आणून दिले. त्याची बरीच छायाचित्रे प्रसारमाध्यमातून सर्व शिवभक्तांनी पाहिली. कोरोना असला, लॉकडाऊन असला तरी दिल्लीला धाव घेतली. केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या बऱ्याच किल्ल्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची गरज असल्याने, आज दिल्लीमध्ये पुरातत्व खात्याच्या नवनियुक्त प्रबंध निदेशक (DG) व्हि. विद्यावती यांची भेट घेतली. त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांना रायगड प्राधिकरणाचे कॅलेंडर सुद्धा भेट दिले.
आनंदाची बातमी : राज्यात प्रथमच एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक
कालची ही भेट फार महत्वपूर्ण ठरली. विजयदुर्ग किल्ल्याविषयी त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत, तात्काळ निर्णय घेण्यास सुरुवातही केली. आज त्या केंद्रीय सांस्कृतीक मंत्री महोदयांना भेटून सदर प्रकरण लक्षात आणून देणार आहेत. लवकरच तटबंदीचे, व बुरुजाचे काम सूरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. असे त्यांनी मला सांगितले.
रायगड च्या बाबत सुद्धा मॅडम जी अत्यंत सकारात्मक आहेत. प्राधिकरणाने दोन अडीच वर्ष सातत्याने प्रयत्न करून हत्ती तलावाची यशस्वी रीतीने गळती काढली. हे ऐकून विद्यावती मॅडम नी प्रशंसा तर केलीच, त्याच बरोबर ह्या पद्धतीचा बारकाईने अभ्यास करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. अजूनही बऱ्याच बाबींवर साकल्याने विचार विनिमय झाला. रायगड विकास प्राधिकरण आणि केंद्रीय पुरातत्व खाते या दोन्ही संस्थानि मिळून काम केल्यास किंवा एकमेकांना पूरक कामे केल्यास लवकरात लवकर रायगड ला पुनरवैभव प्राप्त होईल असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक दृष्टीने सोबत काम करण्याचा शब्द दिला आहे.
दरम्यान, समाजमाध्यमांमध्ये विजयदुर्ग किल्ल्याची अवस्था व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील किल्ल्याच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. विजयदुर्ग हा किल्ला केंद्र शासनाच्या भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असल्याने या किल्ल्याची डागडुजी राज्य शासनाला करता येत नाही, केंद्र शासनाने परवानगी दिल्यास विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी, देखभाल दुरुस्ती तात्काळ करण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे अमित देशमुख यांनी देखील लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

