Share

‘माजी गृहमंत्र्यांचाचं पोलिसांवर विश्वास नाही…’

Published On: 

अहमदनगर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. तसंच पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करणंही योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

यानंतर, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून या प्रकरणी अनेक बड्या व्यक्तींची नावे बाहेर येण्याच्या शक्यतेमुळे मुंबई पोलिसांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप केला होता. तर, बिहार पोलिसांनी मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याची तक्रार देखील केली होती.

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर भाजपच्या नेत्यांनी सरकारला लक्ष केले असून महाविकास आघाडीतील नेते सुद्धा आता मैदानात उतरले असल्याचे दिसत आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

अभिनेता गेल्यावर जितकी चर्चा झाली, तितकी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल झाली असती तर…

या संदर्भात बोलताना नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली आहे. पाच वर्ष भाजपची सत्ता होती. तेव्हा गृहखातं मुख्यमंत्री यांच्याकडे होतं. आता त्याचं मुंबई पोलिसांवर त्यांनी आरोप करणे हे कितपत योग्य आहे? भाजप नेत्यांचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही असा टोला लगावत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांचा समाचार घेतला. तनपुरे काल जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘चौकशी कोणत्याही एजन्सीने केली तरी सत्य तेच राहील’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!