टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरवात झाली असून हि यात्रा गोंदिया येथे पोहचली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल , खा. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते.
यावेळी गोंदिया येथील सभेला प्रफुल्ल पटेल यांनी संबोधित केले. ते यावेळी बोलताना म्हणाले, तुमचे हीत कशात आहे, कोणासोबत आहे याचा विचार करण्याची गरज आहे. स्व. मनोहरभाई पटेल यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली. मात्र, ज्यांनी कोणतेच काम केले नाही त्यांच्या आज मागे लोक उभे राहत आहेत, अशी खंत पटेल यांनी यावेळी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले,आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, राष्ट्रवादी काँग्रसेच्या प्रयत्नांमुळे मिळालेली कर्जमाफी विसरून आताच्या मिळणाऱ्या तुटपुंज्या कर्जमाफीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री आपल्या भागात महाजनादेश यात्रा काढतात. पण एका शब्दाने देखील इथल्या कामाचा उल्लेख करत नाहीत. मग यांच्याकडून न्याय कसा मिळेल? त्यामुळे सरसकट कर्जमाफीची आश्वासने देणाऱ्या या सरकारला सत्तेवरून हटवण्याचे काम आपण सर्वांनी एकत्र येऊन करायचे आहे, असे आव्हान पटेल यांनी केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

