Share

कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ लागू; ‘हे’ लाभ मिळणार

Published On: 

पुणे दि: 1: कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राज्यात लागू करण्यात आली असून फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्या व्यतीरीक्त प्रति सदस्य प्रति महा ५ किलो तांदुळ मोफत देण्याबाबत शासनाकडुन आदेश प्राप्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.

पुणे जिल्हा ग्रामिण भागासाठी एप्रिल, मे व जुन २०२० साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार अन्नधान्याचे वाटप विहित दराने त्या-त्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार एप्रिल २०२० करीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता २३ किलो गहु व १२ किलो तांदुळ तसेच मे व जुन २०२० या महिन्यांकरीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता २५  किलो गहु व १० किलो तांदुळ प्रत्येक शिधापत्रिकेवर त्या-त्या महिन्यांमध्ये देण्यात येणार आहे.

प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रती लाभार्थ्यांकरीता दरमहा ३ किलो गहु व २ किलो तांदुळ देण्यात येणार आहे. सदर गव्हाची किंमत २ रुपये प्रति किलो तर तांदुळ ३ रुपये प्रति किलो आहे. एप्रिल, मे व जुन २०२० साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार विहित दराने अन्नधान्य वितरण झाल्यानंतरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या मोफत तांदळाचे वाटप प्रति सदस्य प्रति महा ५  किलो या प्रमाणे प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जुन २०२०  महिन्यात करण्यात येणार आहे.

संबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतरावरून अंतर ठेवत धान्य घ्यावे. तरी पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, गायकवाड यांनी केले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!