🕒 1 min read
पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे पुण्यात परीक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हणाले आहे. ते म्हणाले कि,’ एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे.’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.
एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो.
करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ?
ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे.— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 11, 2021
राज्य शासनानं परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यामंध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विद्यार्थ्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : गोपीचंद पडळकरांसह पुण्यातील एमपीएससीचे हजारो विद्यार्थी आक्रमक; वातावरण चिघळले
- मोठी बातमी : गोपीचंद पडळकरांसह पुण्यातील एमपीएससीचे हजारो विद्यार्थी आक्रमक; वातावरण चिघळले
- हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये पहिलं शाही स्नान संपन्न…
- लातूरमध्ये मद्यधुंद तरुणांचा धुडगूस, वाहनांच्या काचा फोडल्या
- उस्मानाबादेत दररोज दोन हजार चाचण्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
