Share

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये पहिलं शाही स्नान संपन्न…

Published On: 

🕒 1 min read

हरिद्वार : महाशिवरात्री हा दिवस हिंदू भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाशिवरात्रीनिमित्त शिव मंदिरांची आकर्षक रोषणाईसह फुलांची सजावट केली जाते. अनेक भाविक शिवमंदिरात जाऊन पुजा आणि अभिषेक करतात. या दिवशी मंदिरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. परंतु असे असतना राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे बऱ्याच मंदिर प्रशासनाने मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर दुसरीकडे महाशिवरात्रीच्या निमित्ताने हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये पहिलं शाही स्नान पार पडले आहे. परंतु यावेळी हरिद्वारच्या कुंभमेळ्यात जाण्यासाठी भाविकांना कोरोना चाचणी अनिर्वाय करण्यात आली आहे. तसेच दक्षता म्हणून उत्तराखंडाच्या सीमांवर कॅम्प लावण्यात आले आहेत. या कॅम्पवर तपासणी करुनच भाविकांना आत सोडले जात आहे.

हरिद्वारमधल्या ‘हर की पौंडी’ ब्रह्मकुडांवर सकाळी ९ वाजेपर्यंत २२ लाख लोकांचे शाही स्नान संपन्न झाले आहे. यावेळी जुना आखाडा, आव्हान आखाडा, अग्नि आखाडा आणि किन्नर आखाडा स्नानासाठी उतरले होते. तर निरंजनी आखाडा आणि आनंदी आखाडा दुपारी १ वाजता स्नानासाठी उतरणार आहेत. त्यानंतर महानिर्वाणी आखाडा आणि अटल आखाडा दुपारी ४ वाजता स्नान करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!