Share

समाजकल्याण आयुक्तांच्या सकारात्मक चर्चे नंतर आंदोलनाला स्थगिती

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शाहू,फुले,आंबेडकर अनुसूचित जाती निवासी शाळा योजनेतून सुरू असलेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या मुला मुलींकरिता असलेल्या १६५ आश्रमशाळे च्या विविध मागण्यांसाठी शाहू, फुले, आंबेडकर अनुसूचित जाती निवासी शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना ३ मार्च पासून पुणे आयुक्तालयासमोर ६ दिवस लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू होते. आज संघटनेच्या शिष्टमंडळासोबत समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक चर्चे नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

राज्यातील अनुसूचित जातीच्या १६५ आश्रमशाळांचे गुणात्मक तपासणीच्या अहवालांचे छाननी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिवाय पुन्हा मागवलेली माहिती विविध मुद्यावर काही शाळांकडून अद्याप प्राप्त न झाल्यामुळे अंतिम वर्गवारी करण्याच्या कामात वेळ लागत आहे.

तसेच येथून मंत्रालयात अहवाल गेल्यानंतर या अहवालात कोणत्याही प्रकारची त्रुटी येऊ नये व अडचण निर्माण होऊ नये यासाठी खूप काळजी पूर्वक कागदपत्रे तपासणीचे काम केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने या शाळांसाठी बजेट ची मागणी केली आहे.

या व इतर मुद्यांवरील विषय मार्गी लावू व उपोषण मागे घेण्यास आयुक्त यांनी आवाहन केले आणि सकारात्मक प्रतिसाद देऊन संघटनेतील सदस्यांशी सर्वानुमते चर्चा केली दरम्यान विविध मागण्यांवर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका स्पष्ट केली व संघटनेचे समाधान झाल्याने सहा दिवस सुरू असलेले उपोषण आंदोलन मागे घेण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी दिली.

यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शैलेश कांबळे उपाध्यक्ष संदिप सूर्यवंशी, सचिव संतोष देशमुख, विजय गायकवाड, अविनाश काळे, किरण देसले उपस्थित होते. तर सहा दिवस चाललेल्या आंदोलनात सुनील राडकर, निलेश मालगे, श्रीकांत उमरकर, अतिक अन्सारी, बाबुराव पवार, प्रशांत शिंदे, सिद्धार्थ भद्रे, दत्तात्रय गिरी, ज्ञानेश्वर राजुरे संघटनेतील आदीं कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व आंदोलन यशस्वी केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!