Share

पोस्टरच्या माध्यमातून राहुल गांधींवर निशाना

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेस नेते सलमान निजामी यांच्यावर टीका केल्यानंतर अवघ्या काही तासात निजामी यांच्यावर निशाना साधणारे काही पोस्टर्स अहमदाबादमध्ये आढळून आले आहेत . अहमदाबादमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दहशतवादी अफझल गुरुचे समर्थक काँग्रेसचे नेते सलमान निजामी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘अफजल का जो यार है, वो देश का गद्दार है,’ असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे.

अहमदाबादमधील एका बस स्थानकावर राहुल गांधी आणि सलमान निजामी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या निजामी यांचा राहुल गांधींसोबतचा फोटो आहे. यासोबतच निजामी यांचे वादग्रस्त ट्विटदेखील पोस्टरवर छापण्यात आले आहे. ‘तुम कितने अफजल मारोगे, हर घऱ से अफजल निकलेगा,’ असे ट्विट या पोस्टरवर दाखवण्यात आले आहे.‘अफजल का जो यार है, वो देश का गद्दार है,’ असा मजकूर या पोस्टरवर आहे. निजामी काँग्रेससाठी प्रचार करत असल्याचा स्पष्ट उल्लेख या पोस्टरवर आहे. या पोस्टरवर निवेदक म्हणून सरदार पटेल एकता संघ या संघटनेचे नाव आहे. शनिवारी लुनावाडामध्ये सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलमान निजामी यांच्या विधानावरुन काँग्रेसवर तोफ डागली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!