Share

रुपाली चाकणकर ‘बावळट’ बाई : चित्रा वाघ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील  येथे प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळून हत्या करण्याचा प्रयत्न घडलेल्या घटनेने  अक्खा महाराष्ट्र हादरला . परंतु राजकीय पक्षांमध्ये मात्र यावरून वाद सुरु आहे. भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांच्यात याप्रकरणात आता शाब्दिक वाद पेटला आहे. इतकच नाही तर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर या बावळट आहेत, अशी टीका केली आहे.

याप्रकरणातील पिडीत तरुणी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी पीडित तरुणीला सरकार मदत करत नसल्याचा आरोप केला होता तर यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी भाजप सत्ता गेल्याने हताश झाल्याने विनाकारण आरोप करत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या पीडित मुलीला न्याय मिळण्याआधीच राजकीय वाद सुरू झाला आहे.

भाजप आमदार चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्या म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या ह्या दुर्दैवी घटना घडत आहे. राज्य सरकार अश्या घटना रोखण्यासाठी अपयशी ठरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता राजीनामा दिला पाहिजे. सरकारने आतापर्यंत कोणतीही आर्थिक मदत केलीनसून जर सरकार मदत करत नसेल तर भारतीय जनता पक्ष हा खर्च उचलणार असंही त्यांनी सांगितलं.

चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे. सरकारने  रुग्णालय प्रशासनाला उपचारासाठी ४ लाखाची मदत दिली आहे, तसेच चित्रा वाघ यांनी या प्रकरणात राजकारण आणलं असल्याची टीकाही  चाकणकर यांनी केली. तर ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या डायरेक्टर डॉ.अनुप मराल यांनी सुद्धा हॉस्पिटलला चार लाख रुपयाची मिळाल्याची माहिती दिली असून कुटुंबाकडून कोणताही पैसे मागितले  जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

रुपाली चाकणकर यांच्या प्रत्युत्तरानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ संतापल्या. त्या म्हणाल्या रुपाली चाकणकर ही बाई बावळट आहे. माध्यमांना त्या असही म्हणाल्या तुम्हाला छापायचं असेल तर खुशाल छापा. तसेच आपल्या मागणीनंतरच अवघ्या १० मिनिटांत पैसे जमा झाले आहेत. दोन दिवसांपासून सरकार फक्त घोषणा करत आहे. त्यांना खोटं बोलायला लाजही वाटत नाही ? असेही त्या म्हणाल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!