टीम महाराष्ट्र देशा – राज्यात आणि विशेषकरून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. रोजच्या रोज मुंबईमध्ये कोरोन बाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढतो आहे. यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून खास पत्रकारांच्या कोरोना चाचणीचं एक शिबीर घेण्यात आलं होत. या शिबिरात टेस्ट करण्यात आलल्या १६८ पैकी ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीटरवर दिली आहे.
किरीट सोमय्या ट्वीटरवर म्हणाले, ‘मुंबई बीएमसी आणि टीव्ही इलेक्ट्रॉनिक जर्नलिस्ट असोसिएशनच्या विशेष शिबिरामध्ये कोरोनासाठी १६८ पैकी ५३ पत्रकारांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याचं ऐकून धक्का बसला. मी महाराष्ट्र सरकार आणि टीव्ही चॅनेलच्या मालकांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या उपचारांसाठी पावले उचलली पाहिजेत आणि उपचाराचा खर्च उचलावा . त्यांना विमा संरक्षण देखील मिळवे.’
Shocking to hear 53 of 168 Journalist's tested for Corona, found Positive in Special camp of Mumbai BMC & TV Electronic Journalist Association. I request Maharashtra Govt & TV Channel Owners to take steps/support their full Treatments. Also get them Insurance Cover @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 20, 2020
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं मदतीचं आश्वासन –
मुंबईतील काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाली, हे अतिशय धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वतोपरी मदत करु, असे आश्र्वासन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच, राज्यातील विशेष करुन मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांच्या पत्रकारांना घरातून काम करण्यासाठी संबंधित वृत्तवाहिन्यांच्या मालकांनी व संपादकांनी परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारने सूचना द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पाटील म्हणाले की, राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. त्यातही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना ही कोरोना संक्रमण होणं, हे अतिशय धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्ष पत्रकारांच्या पाठिशी उभे असून, कोरोना संक्रमित पत्रकारांना पक्षाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करु, असे त्यांनी आश्र्वासन दिले.
ते पुढे म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचा वार्ताहर, छायाचित्रकार हे थेट कोरोनाबधितांशी थेट भिडत असतात. त्यामुळे मुंबईत कोरोना संक्रमणामुळे जे पत्रकार रुग्णालयात दाखल झाले आहेत. अशा पत्रकारांना त्यांच्या मालकांनी त्यांचा पुढील तीन महिन्यांचा पगार द्यावा, यासाठी सरकारने त्यांना सूचित करावे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांच्या मालकांनी पगार देण्यासाठी असमर्थता दर्शविल्यास भाजपा यासाठी पुढाकार घेईल.
तसेच राज्यातील विशेष करुन मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पत्रकारांना वर्क फ्रॉम होमसाठी संबंधित दैनिक व वृत्तवाहिन्यांच्या मालकांना व संपादकांना राज्य सरकारने सूचना द्याव्यात अशी मागणी ही पाटील यांनी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्रकार विम्याची मागणी –
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रकार विम्याबाबत विचार करावा असं म्हंटलं आहे. या काळात पत्रकारांच्या सेवेचं महत्व अधोरेखित करतानाच त्यांनी पत्रकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्या ट्वीटरवर म्हणाल्या,
‘धक्कादायक…! मुंबईतील काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. गेल्या काही दिवसांपासून मी पत्रकार,कॅमेरामन व इतर तांत्रिक सहायकांच्या सुरक्षेचा मुद्दा हाती घेतला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या काळात माध्यमकर्मी आपल्यापर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम करत आहेत.’
‘या कठीण काळात त्यांचाही विमा असावा अशी मागणी यापुर्वी मी मांडलेली आहे.माझी @CMOMaharashtra यांना विनंती आहे की, कृपया पत्रकारांनाही विमाकवच प्रदान करण्याबाबत सकारात्मक विचार व्हावा ही विनंती. पत्रकारांना देखील माझी विनंती आहे की,त्यांनी आपले काम करताना पुरेशी काळजी घ्यावी.’
या कठीण काळात त्यांचाही विमा असावा अशी मागणी यापुर्वी मी मांडलेली आहे.माझी @CMOMaharashtra यांना विनंती आहे की, कृपया पत्रकारांनाही विमाकवच प्रदान करण्याबाबत सकारात्मक विचार व्हावा ही विनंती. पत्रकारांना देखील माझी विनंती आहे की,त्यांनी आपले काम करताना पुरेशी काळजी घ्यावी.
— Supriya Sule (@supriya_sule) April 20, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

