Share

कोरोना नियमांचे उल्लंघन करणे संभाजी भिडेंना भोवले, ८० जणांवर गुन्हा दाखल

Published On: 

कराड : महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाहीये. यासोबतच, हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्विकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही.

दरम्यान, सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. बंडातात्या कराडकर यांनी वारीसंदर्भात भूमिका घेतल्यानंतर स्थानबध्द कारवाईच्या निषेर्धात शिवप्रतिष्ठान संघटनेने कराड येथे निषेध मोर्चा काढून संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत कराड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

मात्र आता हा मोर्चा संभाजी भिडे यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. विनामास्क मोर्चा काढून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भिडे यांच्यासहित ८० जणांवर कराड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे गुरुजी यांनी दत्त चौकातून शेकडो धारकांऱ्यांसोबत रॅली काढत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्यांच्यासह 80 धारकांऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!