Share

राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक; कन्हैया कुमारच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर- संपूर्ण राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने राज्यातील सर्वच पालिका खडबडून जाग्या झाल्या आहेत.यातच विविध कार्यक्रम देखील रद्द करण्यात येत आहेत .खबरदारीचा उपाय म्हणून कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृती दिनी आयोजित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमारच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

उद्या कोल्हापुरातील दसरा चौकात ही सभा होणार होती पोलीस प्रशासनाकडून दडपशाही सुरू असल्याचा कार्यकर्त्यांकडून आरोप होऊ लागला आहे.जिल्हाधिकारी परवानगी देतात तर पोलीस का देत नाहीत असा सवाल केला जातोय.

ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशनने या सभेचं आयोजन केलं होतं. या सभेचे अध्यक्ष म्हणून हसन मुश्रीफ यांची निवड करण्यात आली होती. तर या सभेला आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, माजी आमदार मालोजीराजे, JNU मधील विद्यार्थी नेत्या अमृता पाठक या उपस्थित राहणार होत्या.

दरम्यान,पोलिसांनी बुधवारी या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. मात्र, आता परवानगी नाकरली आहे. गोविंद पानसरे यांचा शनिवारी २० फेब्रुवारीला सहावा स्मृतीदिन आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात दोन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कन्हैया कुमार यांची जाहीर सभा होणार होती.

पोलिसांनी बुधवारी या सभेस परवानगी दिली होती. परवानगी देताच गिरीश फोंडे यांनी ही सभा दसरा चौकात उघड्यावर होणार अशी माहिती पत्रकार परिषद घेत दिली. त्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सभेला परवानगी नाकारली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!