नांदेड: कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नांदेड प्रशासनाने जिल्ह्यात मिरवणुका काढण्यास तसेच सार्वजनिक कार्यक्रमास बंदी घातली आहे. असे असतानाही बीदर गुरुद्वारा, मातासाब आणि वसमत येथे विनापरवानगी मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच कोरोना नियमांचा भंगही करण्यात आला होता. यावर वजिराबाद पोलिसांनी कडक पावले उचलत या मिरवणूकीतील ४२ दुचाकी जप्त केल्या.
कोरोनाचा धोका वाढल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरु केली आहे. ठिकठीकाणी पथके रस्त्यावर उतरुन कोरोना विषयी जागरुकता निर्माण करत आहे. या दरम्यान परवानगी नसताना सचखंड गुरुद्वारा येथून बीदर येथील गुरुद्वारा, वसमत गुरुद्वारा आणि मातासाब गुरुद्वारा येथे चौकी काढण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने दुचाकीस्वार सहभागी झाले होते. या मिरवणूकीला परवानगी देण्यात आलेली नव्हती. यातील काही दुचाकीला फटाका आवाज करणारे सायलेंसर बसविण्यात आले.
जप्त केलेल्या दुचाकीपैकी नऊ दुचाकी प्रादेशिक परिवाहन अधिकाऱ्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात अल्या. या कारवाईत नऊ दुचाकीस्वाराकंडून ५३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे, सोमनाथ शिंदे, सुरजितसिंग माली यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- जाणून घ्या भारत चीन दरम्यान आज होणारी बैठक का महत्वाची आहे?
- ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचे शूटिंग कारगिलमध्ये शूट करणार आमिर खान
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- दिवसाढवळ्या चोरीचे प्रमाण वाढले; पोलिस असल्याचा करतात बनाव
- कारसेवकांवर गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या मुलायम सिंहांच्या सूनेने दिली 11 लाखांची देणगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
