मुंबई : अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. मुंबईतील कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आता सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणी पोलीस तपासाला लागली आहे. सिद्धार्थच्या मृत्युनंतर अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. त्यातच सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्टही समोर आला मात्र यामध्ये सिद्धार्थचे मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
दरम्यान, आता सिद्धार्थचा विसरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. केमेकिल एनालिसिस आणि हिस्टोपॅथोलॉजी रिपोर्ट आल्यानंतर सिद्धार्थच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
अभिनेत्याचा मृत्यूचे कारण हे हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीनंतरच स्पष्ट होणार आहे. सुरूवातीला डॉक्टरांनी सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं म्हटलं होतं. मात्र रिपोर्टमध्ये आणखी केमिकल अॅनालिसीसची गरज स्पष्ट करण्यात आली आहे. केमिकल अॅनालिसीसनंतरच सिद्धार्थच्या शरीरात कोणतं विष होते की नाही किंवा त्याला कसला आजार होता स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहित शर्माने या वर्षी कसोटीत केल्या ‘इतक्या’ धावा; सर्व भारतीय फलंदाजांना टाकले मागे
- रोहितची शतकी खेळी, भारत ३ बाद २७०; तिसऱ्या दिवसाअखेरीस विराटसेनेकडे १७१ धावांची आघाडी
- शतकी खेळीसह रोहितनं गाजवले मैदान; मोडला मैथ्यू हेडनचा मोठा विक्रम
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश

