Share

पत्त्याचा डाव मांडून बसलेल्याना पोलिसांचा चोप

Published On: 

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यात रस्त्यावर पत्त्यांचा डाव मांडलेल्या पाच-सहा जणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. राज्यात संचार बंदी आणि देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याने सगळं बंद आहे व अशा वेळेस टाइम पास करण्यासाठी पत्त्यांचा डाव या लोकांनी मांडला होता. मात्र चार पेक्षा अधिक जणांनी एकत्र येणे हे नियमाचे उल्हगणं असून हि वेळ पट्टे खेळण्याची नसून सतर्कता बाळगण्याची असल्याने पोलिसांद्वारे अशी कारवाई करण्यात आली.

पत्त्यांचा डाव मांडून बसलेल्यांना कान पकडून खालीबसून उड्या मारत घरी जाण्याची शिक्षा पोलिसांनी दिली तसेच काठीचा प्रसाद देखील वाटला. व यानंतर असे करू नका हे समजावून सांगितले

तत्पूर्वी औरंगाबाद जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट कमी होतांना दिसून येत आहे. १३ मार्चला कोरोना पॉसिटीव्ह सापडलेल्या महिलेचे उपचारानंतर नेगेटिव्ह रिझल्ट आले व त्यानंतर औरंगाबाद मध्ये एकही कोव्हीड-१९ संसर्ग बाधित रुग्ण आंधळा नसून २३ मार्च पासून लागू करण्यात आलेल्या संचार बंदीचा कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या औरंगाबादला फायदा होतांना दिसतोय. तसेच औरंगाबाद महापालिकाही आपली भूमिका चोखपणे बजावतांना दिसून येतेय. शहराच्या एन्ट्री पॉइंटवर स्क्रिनिंग सुरू केले आहे. बाहेरगावांहून येणाऱ्या प्रत्येकाचे स्क्रिनिंग केली जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!