मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेनेमध्ये अद्यापही वादंग सुरु आहे. कंगनाकडून सरकारवर टीकेची मालिका सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे, कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केल्याने आता राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा फड संतापल्या आहेत.
आहे कोण ही कंगना राणावत ?? हिला मी ओळखत नाही. आणी तिच्यामूळे आपल्या महाराष्ट्राची बदनामी का?आणी मूळात हिचं महाराष्ट्र-मुंबईसाठी योगदान काय? कुत्रा जिथे राहतो, खातो त्याच्याशी इमान राखतो.प्राण्यांना कळतं हिचं काय चोराच्या उलट्या बोंबा हिला मुंबईने सगळं दिल,पण हीचं गद्दार निघाली." अशा शब्दात रेखा फड यांनी कंगनाला सुनावले आहे.
आहे कोण ही कंगना राणावत ?? हिला मी ओळखत नाही. आणी तिच्यामूळे आपल्या महाराष्ट्राची बदनामी का?आणी मूळात हिचं महाराष्ट्र-मुंबईसाठी योगदान काय? कुत्रा जिथे राहतो, खातो त्याच्याशी इमान राखतो.प्राण्यांना कळतं हिचं काय चोराच्या उलट्या बोंबा हिला मुंबईने सगळं दिल,पण हीचं गद्दार निघाली.
— Rekha Phad (@RekhaPhadSpeaks) September 11, 2020
अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेना आणि कंगणामध्ये ट्विटरवॉरहि झाला. कंगनाने मुंबईमध्ये येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर सडकून टीका केली. कंगनाची अद्यापही सरकारवरआरोपांची मालिका सुरूच असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या


