मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर सोशल मीडियावरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबई आणि पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या महिलेला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.
ट्विटरवरून मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाविरोधात निंदनीय आणि मानहानीकारक व्यंगचित्र पोस्ट केल्याने ३८ वर्षीय महिला सुनैना होले यांच्यावर बीकेसीतील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात, आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणि पालघरच्या तुळींज पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र एफआयआर नोंदविण्यात आल्या आहे. होले यांची या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
होले यांनी याविरोधात हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. आपल्यावरील सर्व आरोप रद्द करावेत आणि अंतरिम दिलासा द्यावा, अशी मागणी होले यांनी या याचिकेतून केली होती. तसेच खटल्यावरील सुनावणी होईपर्यंत आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे अशा विनंतीही त्यांनी कोर्टाकडे केली होती. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. त्यावेळी यासंदर्भात पाठविण्यात आलेल्या नोटीसीला त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही असा दावा राज्य सरकारच्यावतीनं केला गेला. यावेळी हायकोर्टाने होते यांना अंतरिम जमीन देण्यास नकार दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात सरकारचा आतंक आणि अत्याचार वाढतोय – कंगनाचा घणाघात
‘ हिला मुंबईने सगळं दिल,पण हीचं गद्दार निघाली ‘
.. ‘यांना भामटे नाही तर काय म्हणावं???’ – अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

