औरंगाबाद : पैठण शहरातील गोदावरी तिरावर असलेल्या तारकेश्वर महादेव मंदीरात गर्दी जमवून पौराहित्य करणाऱ्या पुरोहित व यजमानांवर पैठण पोलिसांनी दि. ९ शुक्रवार रोजी साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे.
आज सकाळी दहाच्या सुमारास शहरातील पौरोहित्य करणारे दहा ते बारा ब्राम्हण हे पाचपिंपळ रस्त्यावर असलेल्या तारकेश्वर मंदीरात शंभर ते दिडशे यजमानांसह पुजा-अर्चा करीत होते.
हि बाब पोलिसांच्या निर्दशनास येताच पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी दाखल झाले. या प्रकरणी साथरोग प्रतिबंधक कायदा कलम १८८, २६९, ७०, कोव्हीड नियम ११ तसेच साथरोग कलम २, ३, ४ नुसार कारवाई केली.
या ठिकाणी उपस्थीत पुरोहितांनी आपली प्रतिक्रीया देतांना सांगीतले की, कोरोनामुळे जगन दुरापस्त झाले असुन पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, एखादे यजमान आले तर कारवाई मग जगावे तर कसे ? असा प्रतिप्रश्न या प्रसंगी बोलतांना उपस्थीत केला.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा निर्धार; रिपब्लिकन पक्षाची जय्यत तयारी
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

