🕒 1 min read
मुंबई : राज्यातील कोरोनाचाबाधितांचा आकडा आता 50 हजारच्या जवळ आला असताना आता पोलिसांना देखील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 87 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1671 वर पोहोचली आहे.
कोरोनाच्या संकटात पोलीस दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र कोरोनाने या योद्ध्यांना देखील आपल्या कवेत घेतले आहे. 174 पोलिस अधिकारी तर 1497 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. तर 18 पोलिसांना करोना मुळे जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 673 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.
आता आलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 87 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1671 वर पोहोचली आहे. तरी देखील पोलीस प्रशासनाने तात्काळ आदेश काढत 50 वयापेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांना सुट्टीवर पाठवले होते. मात्र कोरोनाने पोलीस दलाला देखील लक्ष्य केले.
दरम्यान कर्तव्य बजावताना एखाद्या पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला आता 65 लाखाची मदत दिली जाणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारकडून 50 लाख रूपये आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, मुंबई पोलिस फाऊंडेशनकडून 10 लाखाची मदत आणि खासगी बॅंक इन्श्युरन्सकडून 5 लाखाचा विमा असं या मदतीच स्वरूप असेल.
महत्वाच्या बातम्या
#corona : कोरोनाचा पीएमपीएमएला मोठा फटका, 67 दिवसात 100 कोटीचे नुकसान
‘त्याने’ कोरोना होतो, असं ‘डॉक्टर’ अजित पवारांनी सांगितलंय – संजय राऊत
‘राज्य शासन परप्रांतीयांना अन्नधान्य देऊन शकले नाही म्हणून ते गावाकडे पायी निघाले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
