Share

‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त अखेर ठरला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या कित्येक महिन्यांपासून वादात सापडलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या महिन्याअखेर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट आधी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता मात्र निवडणूक आयोगानं चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली होती. आता हा चित्रपट लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रदर्शित होणार आहे.

याआधी हा चित्रपट ५ एप्रिलला रिलीज होणार होता. परंतु, निवडणुकांमुळे हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. त्यानंतर, नवी तारीख समोर आली, ती होती ११ एप्रिल. परंतु, त्याचदिवशी लोकसभा निवडणुका सुरू होणार होत्या, त्यामुळे निवडणूक आयोगाने चित्रपटाचे प्रदर्शन रोखले. आता चित्रपटाची नवी तारीख समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, चित्रपट निर्मात्यांनी आता हा चित्रपट २४ मे ला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट हा ३८ देशात प्रदर्शित केला जाणार आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटेन, कॅनाडा, ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!