मुंबई : तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या व बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शिका सरोज खान यांचं आज सकाळी निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्या २० जून पासून मुंबईच्या गुरुनानक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत्या.
आज पहाटे २:३० वाजता हृदयक्रिया बंद पडल्याने( Cardiac Arrest) त्यांचे रुग्णालयात निधन झाल्याचे मनिष जगवानी यांनी सांगितले. सरोज खान यांची कोरोना चाचणी देखील घेण्यात आली होते, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजते.
राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा
गेले कित्येक वर्ष बॉलिवूड मध्ये आपल्या नृत्यदिग्दर्शनाने त्यांनी अधिराज्य गाजविले होते. सुमारे २००० हुन अधिक गाण्यांचे त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. देवदास, जब वी मेट आणि तमिळ चित्रपट श्रिंगरम या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांनी बॉलिवूड च्या कित्येक पिढ्यांना नृत्य सोपे वाटेल यासाठी असे काम त्यांनी केले होते. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रितेश देशमुख यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी तसेच राजकीय व्यक्तींनी त्यांना ट्विटर द्वारे श्रद्धांजली वाहिली.
सरोज खान यांनी २०१९ मध्ये करण जोहर याच्या कलंक या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन केले होते ज्यात माधुरी दिक्षित हिने नृत्य केले होते. त्या मास्टरजी म्हणून ओळखल्या जात होत्या.
दिलासादायक : राज्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने ओलांडला एक लाखाचा टप्पा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

