Share

पंतप्रधान मोदी उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा साधणार देशातील जनतेशी संवाद

Published On: 

नवी दिल्ली : लॉकडाऊनबाबत सर्व राज्यांंच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10  वाजता देशाच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. 21 दिवसाचा लॉकडाऊन उद्या संपणार आहे, या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी उद्या काय घोषणा करणार. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी बैठक घेऊन कोरोनाबाबतचा आढावा घेतला. या बैठकीत महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, ओडिसा या   राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन  30 एप्रिलपर्यंत वाढवावा   असे सुचवले होते. तर महाराष्ट्र, पंजाब, ओडीसा, पश्चिम बंगाल या राज्यांनी   आपला लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे.

दरम्यान गेल्या २१ दिवसांच्या काळात मोदींनी दोन वेळा देशाला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी पहिल्यांदा कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्स आरोग्य सेवकांचे मनोबल उंचावण्यासाठी थाळी वाजविण्याचे आवाहन केले होते. मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर आले होते. यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा घरातील लाईट बंद करून दिवा लावण्यास सांगितले होते. यावेळी लोकांनी काहीशी सावधगिरी बाळगली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!