टीम महाराष्ट्र देशा : दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच मोदींनी पहिल्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पीएम किसान योजनेचा लाभ आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून ६००० रुपये देण्यात येतात. मोदी सरकारचं हे मोठं पाऊल मानलं जातं.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला. आणि आज कोणाला कोणते मंत्रिपद देण्यात आले हेही जाहीर करण्यात आले आहे. याचदरम्यान, आज पंतप्रधान मोदींची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. त्या बैठकीत मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
भाजपने या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी पेन्शन आणि शेतकरी सन्मान योजनेसाठीच्या अटी शिथिल करण्याचं आश्वासन दिलं होतं. शिवाय मध्यमवर्गीयांसाठीही अनेक आश्वासने देण्यात आलेली आहेत. दरम्यान, भाजपाने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन हे पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण केले आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून ६००० रुपये देण्यात येतात. तसेच, कॅबिनेटने अटी शिथिल केल्यामुळे देशातील १५ कोटी शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ होणार आहे. यापूर्वी दोन हेक्टर म्हणजे पाच एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ दिला जात होता. विशेष म्हणजे, मोदी सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत. या योजनेतूनही शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या कमी व्हाव्यात या उद्देशातून आर्थिक मदत केली जाते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
