नवी दिल्ली: पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजने अंतर्गत कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजनांद्वारे दर महिना ४ हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.
“पीएम केअर फॉर चिल्ड्रन हा तुम्हा सर्व कोरोनाग्रस्त मुलांच्या अडचणी कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक देशवासी अत्यंत संवेदनशीलतेने तुमच्या पाठीशी आहे. पीएम केयर्सच्या माध्यमातून देश आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न कोणत्याही एका व्यक्तीचा, संस्थेचा किंवा सरकारचा नाही. तर आपल्या कोट्यवधी देशवासीयांनी पीएम केअरमध्ये कष्टाचे पैसे आणि घामाचे पैसे जोडल्याचा आहे.”, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/BJP4India/status/1531186664043085825
“तुम्ही ज्या धैर्याने या संकटाचा सामना केला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना सलाम करतो. देशाच्या भावना तुमच्या पाठीशी आहेत. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. या संकटाच्या काळात माता भारती तुम्हा सर्व मुलांसोबत आहे. आज आपले सरकार 8 वर्षे पूर्ण करत असताना देशाचा आत्मविश्वास, देशवासीयांचा स्वतःवरचा विश्वास अभूतपूर्व आहे. भ्रष्टाचार, हजारो कोटींचे घोटाळे, घराणेशाही, देशभर पसरलेल्या दहशतवादी संघटना, प्रादेशिक भेदभाव आणि २०१४ पूर्वीचे दुष्टचक्र यातून देश आता बाहेर पडत आहे.”, असा टोलाही मोदींनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- “तुमची मॅजिक फिगर लोकांसमोर एकदा मांडाच” ; नाना पटोलेंचं भाजपला आव्हान
- IPL 2022 : “त्याने आपली बॅट बॅगमध्ये भरून…” विराटच्या खराब कामगिरीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचा सल्ला
- IPL 2022 Final : “मिस्टर पंड्या, आता कसं वाटतंय?”, ट्रॉफी जिंकल्यानंतर कोच नेहराचा हार्दिकला मजेशीर सवाल! पाहा VIDEO
- घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न, भाजपनं संभाजीराजेंना फसवलं – संजय राऊत
- “महाराष्ट्रात कुठेतरी, कुठल्यातरी गावात…”, रितेश देशमुखने पोस्ट केली विलासराव यांची लग्नपत्रिका


