🕒 1 min read
नवी दिल्ली : आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 ची धूम सुरू झाली आहे, कारण या मेगा इव्हेंटसाठी संघांनी यूएई आणि ओमान गाठणे सुरू केले आहे. बीसीसीआयने यजमान यूएई आणि ओमानमध्ये टी -20 विश्वचषकाचे आयोजन केले आहे. तर येत्या 24 ऑक्टोबर रोजी दुबई मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामान खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनी एक अजब दावा केला आहे. पाकिस्तानच्या संघाने जर टी -20 विश्वचषकात भारताचा पराभव केला तर पीसीबीला गुंतवणूकदाराकडून रिक्त चेक मिळणार असल्यानं त्यांनी म्हंटल आहे.
पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा म्हणाले की, ‘एका गुंतवणूकदाराने त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना आश्वासन दिले आहे की, जर पाकिस्तान भारताविरुद्धच्या टी -20 विश्वचषक सामन्यात आपला पहिला विजय नोंदवू शकला तर बोर्डला त्या गुंतवणूकदाराकडून रिक्त धनादेश मिळेल. पुढे ते म्हणले, ‘पीसीबी आयसीसीच्या 50 टक्के निधीवर चालते. आयसीसीचा 90 टक्के निधी हा भारताकडून येतो. मला भीती वाटते की जर भारताने आयसीसीला निधी देणे बंद केले तर पीसीबी कोसळू शकते. कारण पीसीबी शून्य टक्के निधी देते. असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
पाकिस्तानमध्ये बरीच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले नाही, तर पीसीबीला न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या नियोजित मालिकेपासून मोठ्या आशा होत्या. मात्र या दोन्ही संघांना आपापल्या दौऱ्यातून माघार घेतल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. यामागे सुरक्षेची कारणे सांगितली गेली.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप; बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल
- ‘ड्रग्ज प्रकरणाचे राजकारण करणाऱ्या मलिक यांनी ते पालकमंत्री असलेला जिल्हा वाऱ्यावर सोडला’
- सोलापुरात कॉंग्रेसला पडले खिंडार; दिग्गज नेत्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम आणखी एका हत्येप्रकरणी दोषी; पंचकुला न्यायालयाचा निर्णय

