Share

आधी भारताशी खेळा आणि मग कुटुंबाला भेटा, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा विशेष निर्णय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : येत्या ३० तारखेपासून इंग्लंड मध्ये क्रिकेटच्या विश्वचषकाला सुरवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ हा वर्ल्डकप आपल्याचं घरी घेवून जाण्याच्या तयारीत इंग्लंड मध्ये दाखल झाला आहे. तर पाकिस्तान हा संघ भारताला विश्व चषकात हरवण्याच्या तयारीत इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.

आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ भारताला एकदाही पराभूत करू शकला नाही. त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये इतिहास बदलण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने पाकिस्तान संघासाठी एक विशेष निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत भारताचा सामान होत नाही, तोपर्यंत कुटुंबियांबरोबर राहता येणार नाही, असा निर्णय पीसीबीने घेतला आहे.

वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंचे कुटुंब त्यांच्याबरोबर राहत होते. पण या मालिकेत पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध एक ही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या गोष्टीमधून पीसीबीने काही तरी धडा घेतला आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यानंतरच पाकिस्तानच्या खेळाडूंना आपल्या कुटुंबियांबरोबर राहता येणार असल्याचे पीसीबीने सांगितले आहे.

दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील लाजीरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संघाने वर्ल्डकपच्या संघात दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. याआधी जाहीर केलेल्या संघातून जुनैद खान व फहीम अशरफ यांचे नाव वगळण्यात आले असून त्यांच्या जागी मोहम्मद आमीर व वाहब रियाज यांचा समावेश करण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!