Share

‘प्लेबॉय’ मॅगझिनचा संस्थापक पडद्याआड……

Published On: 

🕒 1 min read

१९५३ मध्ये ह्यूज हेफनर यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली. मासिकातील नग्न छायाचित्रे, अतिधीट विषयांवरील चर्चा आणि मुलाखती यामुळे साहित्य विश्वात मोठे वादळ निर्माण झाले. मात्र, त्यानंतर तब्बल दोन दशके हे मासिक साहित्यिक विश्वात कायम चर्चेचा विषय राहिले. साहित्य, समाज आणि पारंपरिक अमेरिकी विचारधारा यांच्यावर बंडखोरीतून आसूड ओढत असतानाही केवळ अनावृत ललनांच्या दिलखूश छायाचित्रांच्या माऱ्यामुळे प्लेबॉय मासिकाचा १९५३ सालापासून जगभर प्रसार झाला.

प्लेबॉय’ या जगप्रसिद्ध मासिकाचे जनक ह्यू हेफनर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. प्लेबॉय एन्टरप्रायजेसकडून पत्रक प्रसिद्ध करून हेफनर यांच्या मृत्यूबद्दलची माहिती देण्यात आलीजगभरात सर्वाधिक विकलं जाणारं मॅग्झिन म्हणून ‘प्लेबॉय’ची ख्याती होती. 20 शतकात लैंगिक क्रांती घडवणारं मॅग्झिन म्हणूनही प्लेबॉय नावारुपास आलं.

‘प्लेबॉय’ हे जगभरातल्या तरुण वयातील मुलांमध्ये प्रचंड आकर्षण असलेलं मासिक. नग्न, अर्धनग्न तरुणींचे बोल्ड फोटोपाहण्यासाठी ‘प्लेबॉय’चा अंक हातोहात विकले जात असत. अमेरिकेपासून ते जगभरातील कानाकोपऱ्यात ‘प्लेबॉय’ पोहोचलंहोतं.जागतिकीकरणाआधी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या गोष्टींपैकी एक म्हणून या मासिकाची नोंद केली जाते. याशिवाय, ह्यू हेफनर अमेरिकेतील व्यक्तीस्वातंत्र्याच्या चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. अमेरिकेतील टपाल विभागाने ‘प्लेबॉय’ मासिक घरपोच देण्यास नकार दिल्यानंतर ह्यू हेफनर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

अनावृत शरीर छब्यांसोबत वैचारिक आणि साहित्यिक मेजवानीचा झरा प्लेबॉयने कधी आटू दिला नाही. १९८० नंतर बदलत जाणाऱ्या स्पर्धेचा, इंटरनेटचा आणि नियतकालिक वाचनाच्या घटत्या ओघाचा फटका प्लेबॉयला बसला. आज इंटरनेट आणि समांतररीत्या हॉलिवूडला झाकोळण्याची ताकद निर्माण झालेल्या पोर्न विश्वाने स्त्री नग्नतेची व्याख्या बदलून टाकली आहे.

या धर्तीवर आपल्या मासिकाचे एकेकाळी असलेले खपमूल्य झुगारून देऊन ‘प्लेबॉय’ने २०१५ मध्ये आपल्या पानांवरून स्त्री-शरीराची दिगंबरावस्था दाखवणार नसल्याचे या महिन्यात जाहीर केले. या माध्यमातून मासिकाला कौटुंबिक स्वरूप देण्याचा आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

1 ऑक्टोबर 1953 रोजी ‘प्लेबॉय’चा पहिला अंक प्रकाशित झाला होता. 1970 साली ‘प्लेबॉय’ मासिकाचा खप 56 लाखाच्या घरात होता. मात्र 62 व्या वर्षी 8 लाखांवर घसरल्याची अधिकृत आकडेवारी आहे. नग्न नाही तरी महिलांचे मादक फोटो टाकणार असल्याचं सांगण्यात येतं. ‘त्याकाळची नग्नतेची लढाई आम्ही जिंकलो. आज तुम्ही एका क्लिकसरशी कुठलाही सेक्स अॅक्ट पाहू शकता. आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं उद्दिष्ट तेव्हा साध्य झालं आहे.’- ह्यू हेफनर

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!