नागपूर : कोरोना महामारीने देशात थैमान घातलं आहे. देशभरातमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ११९२९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३२०९२२ वर गेला आहे. तर १४९३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १६२३७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण ९१९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित असताना तो उठविल्यानंतर लगेचच याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. कोरोनाच्या रुग्णांनी तीन लाखांचा आकडा पार केलेला असतानाच आजची आकडेवारी देशाला चिंतेत टाकणारी आहे. यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिवीर या औषधाची ट्रायल सुरू होत असतानाच आता प्लाझ्मा थेरपीच्या साहाय्याने रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी राज्याला मिळाली आहे. २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० रुग्णांवर उपचार होतील. याचे यश आजमावल्यावर या थेरपीची पुढील दिशा ठरेल.
#व्यक्तिविशेष : चे गव्हेरा- जगभरातल्या क्रांतिकारकांचा आणि युवकांचा आदर्श
एवढ्या व्यापक स्वरूपात या थेरपीची ट्रायल घेणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसनिर्मितीचे जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असले तरी ती लस आणखी काही महिने तरी दृष्टिपथात नाही. त्यामुळे औषधोपचारांच्या अन्य प्रयोगांच्या बरोबरीनेच प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेच्या चाचण्या अनेक देशांमध्ये सुरू आहेत.
महाराष्ट्र सरकारला एप्रिल महिनाअखेरीस मर्यादित स्वरूपात या थेरपीसाठी परवानगी मिळाली होती. मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर येथे १६ रुग्णांवर त्या ट्रायल झाल्या असून, त्यात संमिश्र यश प्राप्त झाले आहे. प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या व्यापक स्वरूपात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नागपूर मेडिकल कॉलेजने राज्य सरकारच्या माध्यमातून सेंट्रल ड्रग अथॉरिटीकडे केली होती. दोन दिवसांपूर्वी नागपूरसह राज्यातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ते प्रयोग करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले, अमित शहांनी घेतले सूत्र हाती; बोलावली तातडीची बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

