Share

ऊस उत्पादन वाढीसाठी कांडी लागणी पेक्षा रोप लागवड करा

Published On: 

कागल : ऊस लागवडीसाठी रोप लागण फायदेशीर आहे.त्यामुळे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी कांडी लागणी पेक्षा रोप लागवड करा असे आवाहन कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे ऊस शास्त्रज्ञ डॉ. अशोक पिसाळ यांनी केले. कागलच्या श्री.छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित आँनलाईन झुम अँपच्या माध्यमातून तिसऱ्या ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमावेळी ते सभासद शेतकऱ्यांशी संवादावेळी बोलत होते.

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीला धावला ‘अजिंक्यतारा’, ‘असं’ करणारा पहिलाच कारखाना

पिसाळ यांनी हंगामनिहाय ऊस लागवडीसाठी जातीचे नियोजन व रोप लागणीसाठी सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी 200 हुन अधिक ठिकाणांहून 3 हजार सभासद शेतकरी या परिसंवाद मध्ये सहभागी झाले.

ते पुढे म्हणाले ,को ८६०३२ ही जात सर्व हंगामात चांगले उत्पादन देते.को एम १०००१ , को ९२००५,९०५७ या जाती पुर्व व सुरू हंगामात लावाव्यात .तर सी ओ एम ०२६५ सारखी जात क्षारपड व पाणथळ जमीनीत लावावी .याशिवाय आपल्या भागातील जमिनीचा प्रकार , वातावरण बघून स्वतःच्या अनुभवातून ऊस जाती बाबत ठरवावेअसेही ते म्हणाले.ऊस रोप लागणीविषयी बोलताना ते म्हणाले,रोप लागणीमुळे बियाणांचा खर्च कमी होतो. पहिल्या दीड महिन्यांतील खर्च वाचतो. उगवण व वाढ एकसारखी होते.तूट पडत नाही.

यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन समरजीतसिंह घाटगे म्हणाले, गळीत हंगाम 2020- 21 मध्ये कारखान्याची प्रतिदिनी सात हजार वरून आठ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्यात येणार आहे.दहा लाख मे टनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी पिकविलेल्या संपूर्ण उसाची नोंद देऊन गळीतास पाठवावा.तसेच थेट सिरप पासुन इथेनॉल निर्माण करण्याचा प्रकल्प सुद्धा हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ऊसाला चांगला दर देण्यासाठी फायदा होईल. याशिवाय कारखाना कार्यक्षेत्रातील महिला सभासदांसाठी अशाच पद्धतीने आँनलाईन पद्धतीने परिसंवादाचे आयोजन कारखान्याच्या ज्येष्ठ संचालिका व मार्गदर्शिका श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करू . यावेळी त्यांनी कारखाना निर्मित हँड सॅनिटायझर फास्ट ओ क्लीनच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केले

यावेळी सुनिता कोंडेकर,मंगल संकपाळ, के बी चव्हण ,गोविंद साबळे,बाळासो चौगुले ,सागर गायकवाड ,आदी शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढी बाबत प्रश्न विचारले. या ऑनलाईन परिसंवादमध्ये कारखान्याच्या ज्येष्ठ संचालिका व शाहू ग्रूपच्या मार्गदर्शिका श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे, यांचेसह व्हा.चेअरमन अमरसिंह घोरपडे यांचेसह सर्व संचालक सहभागी झाले.कर्नाटकचे माजी उर्जा राज्यमंत्री व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

आमच्या सर्कसमध्ये विदुषक हवाय, पवारांनी एकच मारला पण सॉल्लिड मारला !

कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेती अधिकारी आर एम गंगाई,ऊस विकास अधिकारी के बी पाटील व आय टी मँनेजर सुहास मगदूम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.स्वागत व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले. आभार संचालक यशवंत माने यांनी केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!