Share

आमच्या सर्कसमध्ये विदुषक हवाय, पवारांनी एकच मारला पण सॉल्लिड मारला !

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र सरकार तीन पक्षांचे सरकार आहे . मात्र महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस होत असल्याचा घणाघाती टोला केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारचे विकासाचे व्हिजन असायला पाहिजे ते बिलकुल दिसत नाही. अस देखील राजनाथ सिंग म्हणाले आहेत. . भाजपाच्या महाराष्ट्र जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

आता राजनाथ सिंग यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सॉल्लिड प्रत्युत्तर दिल आहे. आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, विदुषकाची कल्नाही आहे. पण, विदुषकाची मात्र कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपुस समाराच घेतला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणातील वादळग्रस्त भागाला भेट देण्यासाठी म्हणून पाहणी दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीला धावला ‘अजिंक्यतारा’, ‘असं’ करणारा पहिलाच कारखाना

दरम्यान, शरद पवारांनी राजनाथ सिंहांना सणसणीत प्रतिटोला दिला असतानाच शिवसेनेकडूनही त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काम अगदी सुसूत्रतेने सुरु असून, उलटपक्षी मध्य प्रदेश, गुजरातमध्येच सर्कस सुरु असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी दिली. सोबतच केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी लडाख मुद्द्यावर जास्त लक्ष द्यावं असा सूरही त्यांनी आळवला आहे.

नाभिक समाजाच्या प्रश्नांचे राजकारण होत असताना गिरीश बापटांनी केली थेट मदत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!