Share

९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आजपासून सुरवात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : उस्मानाबाद मध्ये आजपासून ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. यावेळीही नेहमीप्रमाणे यंदाचे साहित्य संमेलनही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होण्यापूर्वीच काही प्रसिद्ध पुस्तकांच्या पायरेटेड प्रतींची वाढत्या किंमतीत विक्री होत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

या पुस्तकांमध्ये नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र ‘आमचा बाप आणि आम्ही’ आणि किशोर शांताबाई काळे यांचं आत्मचरित्र ‘कोल्हाट्याच पोर’ या पुस्तकांच्या पायरेटेड प्रती होत्या. ही दोन्ही पुस्तक ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. त्याचबरोबर इतर अनेक लेखकांच्या पायरेटेड पुस्तकांच्या प्रतींही इथे खुलेआम विक्री सुरु होती. आज सकाळी सकाळी संमेलनातील खाद्य पदार्थ्यांच्या स्टॉलवर ही पायरेटेड पुस्तकं आढळून आली. ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

याचा खुलासा करताना हिंगलासपूरकर म्हणाले कि, ‘कोल्हाट्याचं पोर’ या पुस्तकाची छापील किंमत १२५ रुपये आहे. पण हेच पुस्तकाची पायरेटेड प्रत १५० रुपयांना विकली जात होती. तर ‘आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकाची छापील किंमत १५० रुपये असताना त्याची पायरेटेड प्रत २५० रुपयांना विकली जात असल्याचे ते म्हणाले.

हा सर्व गैरप्रकारतून आस समोर आल कि, मराठवाड्यात लोकप्रिय पुस्तकांची पायरसी करणारे ८ विक्रेते आहेत. हे लोक अनेक जुन्या प्रसिद्ध मराठी पुस्तकांच्या पायरेटेड प्रती छापत असतात. मात्र, याचे लोण थेट साहित्य संमेलनापर्यंत पोहोचणे हे निंदणीय आहे. संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशक पुस्तकांवर सवलती जाहीर करीत असतात. त्यातच संमेलनात पायरसीद्वारे वाढीव किंमतीत पुस्तकं विकणे ही वाचकांची मोठी फसवणूक आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही हिंगलासपूरकर यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!